Garava Dialogs & Lyrics

GARAVA DIALOGS
garava dialogs...सर्व गारवाप्रेमींसाठी
हेच ते शब्द जे मनाला भिडतात,मनात खोलवर रुतुन बसतात.
.जुन्या आठवणींना उजाळा देतात..अन....
.आयुष्यातले सारेच पावसाळे डोळ्यांसमोर उभे करतात!!!!---
विशाल..गारवाप्रेमी.....
● ════════════◄►════════════ ●
त्याला पाऊस आवडत नाही.....
त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.
पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.
पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.
पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं.
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते.
पावसासकट आवडावी ती म्हणूण ती ही झगडते.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.
● ═══════◄TECHNOVISH►═══════ ●
पाणी झरत चालले
पाणी झरत चालले आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले
पाणी झरत चालले झाड झाडाच्या मीठीत
आता झाडाच्या भवती रान आगीच्या ढगीत
पाणी झरत चालले नदी सागर भरती
वाळू ओलावली सारी दोन्ही किनारयावरती
पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान
पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान
आता किलबिलताहे झाडाझाडातून पाखरं
पाणी झरत चालले आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले
● ═══════◄TECHNOVISH►═══════ ●
पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात
तिचे माझे सारेच पावसाळे, माझ्या मनात भिजून जातात
पुन्हा पाऊस ओला ओला, पुन्हा पाऊस बांधून झूला
तिच्याकडले उरले झोके, परत करतो माझे मला
पुन्हा पाऊस खूप ऐकतो, पुन्हा पाऊस खूप बोलतो
त्याच्या माझ्या गप्पांमधले तिचे थेंब अलगद झेलतो
पुन्हा पावसाला सांगतो मी, पुन्हा पावसाशी बोलतो मी
माझे तिचे आठवण थेंब, पुन्हा पावसालाच मागतो मी.........
● ═══════◄TECHNOVISH►═══════ ●
बघ माझी आठवण येते का?
मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का ? वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन होनाहिच जाणवलं काही तर बाहेर पड,
समुद्रावर ये तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?
मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे चालत रहा पाऊस थांबेपर्यत,
तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेलत्याच्या हातातली बॅग घे,
रेनकोट तो स्वतःच काढ़ेलतो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण,
तू म्हणं घर गळतयंमग चहा कर, तूही घे तो उठून पंकज उधास लावेल,
तो तू बंद कर किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?
मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणंविजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का? यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर यानंतर उशीखाली सुरी घे,
झोपी जाण्याचा प्रयत्न करयेत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?---विशाल..गारवाप्रेमी.....
● ═══════◄TECHNOVISH►═══════ ●
रिमझिम धून, आभाळ भरुन
रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ?
मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून
गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुन
वार्‍यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्‍यात आता,
सुरात तुला मी कवळून
रिमझिम धून, आभाळ भरुन
...विशाल..गारवाप्रेमी.....
● ═══════◄TECHNOVISH►═══════ ●

TecnoVish....Be technical

Hi friends,

For All Your needs And convinience,...
I am Providing Various Free Softwares and downloads for you..Download them and Use .Also Variety of technical posts ,links and other stuff..You can listen your fevorite songs online...Right here right now...!!!
So keep
Visiting......and make your life Digital and
technical....

Have a Nice Day!!!

Counter